चार शब्द…

दोन वर्षापूर्वी मी ‘हसरी उठाठेव’ हा ब्लॉग लिहायला सुरु केला. सुरवातीला विनोदी लिहायचो. पण आजुबाजूला मनाला भिडतील अशा घटना दिसू लागल्यावर माझ्यातला लेखक मला गप्प बसू देईना. म्हणून मी माझ्यावर विनोदापुरतीच मर्यादा न घालून घेता आवडेल ते लिहायला लागलो आणि विनोदाशिवाय खूप लेखन झाले. ते ‘हसरी उठाठेव’ या ब्लॉगवर लिहीणे म्हणजे लोकांचा भ्रमनिरास केल्यासारखे होईल म्हणून जुन्या ब्लॉगचे नामकरण ‘लेखकाची डायरी’ असे करण्यात आले आहे. या डायरीत तुम्हांला वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, लेख वाचायला मिळतील आणि तुम्हांलाही ते नक्की आवडतील अशी अपेक्षा. आपल्या बर्‍यावाईट प्रतिक्रियांचे मनापासून स्वागत आहे.

१ ऑगस्ट २०१९.